आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मंत्रालयात भीषण आग; महत्वाची कागदपत्रे जळून खाक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: राज्याच्या मंत्रालयाला गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांची कार्यालये जळून खाक झाले आहे. यात मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या कार्यालयाचा समावेश आहे. 14 जण या आगीत जखमी झाले. त्यात तीन जनसंपर्क अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यांच्यावर जेजे रुग्णायात उपचार सुरु आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत असून लष्कर आणि फोर्स- वनची मदत घेण्यात येत आहे. राज्यपाल शंकरनारायण् यांनी घटनास्थळाची हवाई पाहाणी केली. नौदलाचे चॅपर हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहचले आहे. एक- दीड तासात आगीवर नियंत्रण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपूते यांच्या कार्यालयाला आग लागली होती. त्यानंतर ती सर्वत्र पसरली. आग लागून दोन तास उलटले असून आगीवर नियंत्रण मिळू शकलेले नाही. फायर ब्रिगेटच्या 30 गाड्यांच्या मदतीने आग विझविण्‍यात येत आहे. पाण्‍याची टंचाई जाणवत असल्याचे वृत्त आहे. चौथ्या मजल्याला लागलेली आग आता तिसर्‍या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरही पसरली असून कार्यालयांमधील महत्त्वाच्या फाईल्स आणि साहित्य जळून खाक झाले आहे.
मुख्यमंत्री चव्हाण, उपमुख्यमंत्री पवार, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, सचिन अहिर, बबनराव पाचपुते, हर्षवर्धन पाटील, भास्कर जाधव, पतंगराव कदम यांची कार्यालये जळून खाक झाली आहेत. तसेच जमीन वाटपाच्या फाईल, यूएलसी, महसूल खात्याच्या महत्वाच्या फाईल, अनेक महत्त्वाच्या समित्यांचे चौकशी अहवाल, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या चौकशीचे अहवाल आणि लवासाची फाईल जळाल्याची भीती वर्तवली जात आहे.
आगीने मंत्रालयात लोळ उठत असल्याने परिसरात धूर पसरला आहे. या धुराने गुदमरुन दोन कर्मचारी बेशुद्ध पडले असून त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. या आगात जीवित हानी झाली नसली तरी मंत्रालयाचे मोठे नुसान झाले आहे. महत्त्वाच्या फाईल्स, कागदपत्रे जळून खाक झाले आहे. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Articles:

मंत्रालयातील आगीच्या ठिकाणांचं व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार
'आदर्श'ची फाईल सुरक्षित, अनेक महत्त्वाच्या फाईल्सचा कोळसा
VIDEO : मंत्रालयाला भीषण आग; महत्वाची कागदपत्रे खाक
मंत्रालयात भीषण आग; राज्यपालांची हवाई पाहाणी
‘महिंद्र’च्या स्टोअरला भीषण आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान
नाशिकमध्ये साखलाज मॉलला आग; सुरक्षारक्षकाचा गुदमरून मृत्यू