आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करणाऱया राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या (सेन्सार) मुंबईतील मुख्य कार्यालयावर हल्ला करण्यात आला. सेन्सॉरच्या संचालक मंडळावर मराठी व्यक्ती नसल्याचा राग व्यक्त करत मनसेच्या चित्रपट विभागाने हे आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी ही संस्था १९५२ मध्ये स्थापन करण्यात आली. या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. तसेच चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, तिरुअनंतपुरम, हैदराबाद, नवी दिल्ली, कटक आणि गुवाहटी येथे या संस्थेची उपकेंद्रे आहेत. इतर राज्यांसाठी सेन्सॉरची प्रादेशिक (रिजनल) कार्यालये आहेत. मात्र मराठीसाठी अशी स्वतंत्र सोय नाही. मुंबईत सेन्सॉरचे मुख्य कार्यालय असून त्याचे मूळचे स्वरुप राष्ट्रीय आहे. त्यामुळे मराठी माणसांना तेथेही स्थान मिळत नाही. सध्या सेन्सॉरच्या अध्यक्षा लीला सॅमसन या आहेत. तसेच त्याच्या संचालक मंडळावर एकही मराठी माणूस नाही. मराठी चित्रपटसृष्ठी एवढी मोठी असताना तसेच त्याला प्रदीर्घ परंपरा असताना मराठी चित्रपट सृष्टीचा अपमान होतो, त्यामुळे आंदोलन करत असल्याचे मनसेच्या चित्रपट व कला विभागाने म्हटले आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी आतापर्यंत २६ जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यात अपर्णा मोहिते यांना सोडले तर मराठी माणसाला सेन्सॉरच्या अध्यक्षपद कायमच खुणावत आहे. आता तर संचालक मंडळावर एकाही मराठी माणसाचा समावेश नाही.
ऊसदरवाढसाठीचे आंदोलन पेटले; मनसे रस्त्यावर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.