आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वानखेडेवरील वर्तनासाठी शाहरुखला राज्‍यसभेसाठी नामनिर्देशित करावेः बाळासाहेब

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः वानखेडे स्‍टेडियमवर झालेल्‍या वादानंतर शिवसेना आणि महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने शाहरुख खानवर कडाडून टीका केली आहे. मनसेने तर त्‍याला सर्वप्रथम मराठी शिकण्‍याचा सल्‍ला दिला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्‍ये बाळासाहेब ठाकरेंनी शाहरुखवर टीका करताना म्‍हटले आहे की, त्‍याला स्‍टारडम सांभाळता येत नाही. वारंवार तो आवेशात येतो. अमेरिकेमध्‍ये त्‍याचा नेहमी अपमान होतो. तिथे त्‍याला तासनतास रोखून ठेवण्‍यात येते. कपडे काढून तपासणीही करण्‍यात येते. तिथे शाहरुखला राग येत नाही. परंतु, भारतात एका सुरक्षारक्षकाने त्‍याला अडविल्‍यावरुन तो आकांडतांडव करतो. त्‍याला स्‍वतःवर नियंत्रण ठेवणे शिकावे लागेल. शाहरुखने अमिताभ बच्‍चन यांचा सल्‍ला ऐकावा, असेही 'सामना''मध्‍ये म्‍हटले आहे. बाळासाहेबांनी शाहरुख आणि सैफ अली खानच्‍या मुद्यज्ञवरुन कॉंग्रेसवर चांगलेच तोंडसुख घेतले. काही महिन्‍यांपुर्वी सैफ अली खाननेही अशाच प्रकारचे वर्तन केले होते. त्‍यानंतरही त्‍याला 'पद्मश्री'ने सन्‍मानित करण्‍यात आले होते. कदाचित त्‍यासाठी त्‍याचा सन्‍मान करण्‍यात आला असावा. आता शाहरुखचा तर त्‍यापेक्षाही मोठा सन्‍मान करायला हवा. त्‍याला राज्‍यसभेसाठी कॉंग्रेसने नामनिर्देशित करावे, असे बाळासाहेबांनी म्‍हटले. शाहरुख खान आणि सैफला कॉंग्रेसकडून संरक्षण असल्‍याची टीकाही बाळासाहेबांनी केली. अमेरिकेत शेपुट घालुन असता आणि भारतात प्रामाणिक सुरक्षारक्षकासोबत वाद घालतो, असे बाळासाहेब म्‍हणाले.
मनसेनेही शाहरुखला मराठी शिकण्‍याचा सल्‍ला दिला आहे. शाहरुखला अ‍डविणारा सुरक्षारक्षक मराठीमध्‍ये बोलत होता. शाहरुखने हे स्‍वतः मान्‍य केले होते. तो मराठीमध्‍ये शिवीगाळ करीत आहे, असे वाटल्‍याने आपण चिडलो, असे शारुखनेच सांगितले होते. यावरुन मनसेने त्‍याच्‍यावर कडाडून टीका केली आहे. अनेक वर्षे मुंबईत राहुनही त्‍याला मराठी येत नाही. त्‍याने मुंबईमध्‍येच सर्वकाही मिळविले. त्‍याने आतापर्यंत मराठी शिकायला हवी होती. आधी मराठी शिकावे, मग बोलावे, असे मनसेने म्‍हटले आहे.
शाहरुख खानला वानखे़डे स्टेडियमवर येण्यास ५ वर्षांची बंदी
विजयानंतर शाहरुखचा वानखेडेवर धिंगाणा, पाहा फोटोफिचर...