आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Toll Campaign Is Only For Ransom Says Udhav Thackray

मनसेचे टोलनाका आंदोलन हफ्तावसुलीसाठीच- उद्धव ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘महापालिका निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानेच बेताल वक्तव्ये केली जात असून, चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक असतात,’ अशा शब्दात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत राज ठाकरेंवर टीका केली. आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर शिंगावर घेऊ आणि वेळ आल्यास आम्हीही त्यांची अंडीपिल्ली बाहेर काढू, असा सज्जड इशाराचही उद्धव यांनी दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेवर टीका करताना ‘प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा म्हणजे मनपा निवडणुकीतील परतफेड’ असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अहमद पटेल यांना कोण भेटले हे त्यांनी जाहीर करावे. ज्यावेळेस ही भेट झाली तेव्हा ते पलंगाखाली लपले होते का? तेव्हाच त्यांनी ही गोष्ट जाहीर का केली नाही, का तेथे ते टोल ठेकेदारांबरोबर चर्चा करण्यास आले होते? मनसेने भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर कशा पद्धतीने ‘सेटलमेंट’ केले हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांचे टोलनाक्यावरील आंदोलन हफ्ते बांधून घेण्यासाठीच आहे. राष्ट्रपतिपदाबाबतचा निर्णय म्हणजे टोलनाक्यावरील हफ्ता वसुली नव्हे, असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. प्रणव मुखर्जी हे चांगले उमेदवार असल्यानेच त्यांना पाठिंबा दिला, याचा अर्थ आमचा काँग्रेसला पाठिंबा आहे, असे स्पष्टीकरणही उद्धव यांनी दिले. रालोआच्या निर्णयापूर्वीच शिवसेनेने पाठिंबा जाहीर का केला? या पत्रकारांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्ष एकमताने सक्षम उमेदवार निवडू शकले नाहीत. जर एपीजे अब्दुल कलामांना उमेदवारी दिली असती तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार केला असता. सर्व विरोधी पक्षांनी संगमा यांना पाठिंबा घोषित केल्यास शिवसेना निर्णय बदलणार का?
या प्रश्नावर त्यांनी ‘जर तसे झाले तर विचार करू,’ असे मोघम उत्तर दिले. मनोहर जोशी उपराष्ट्रपतिपदासाठी इच्छुक असून शिवसेना त्यांच्या नावाचा विचार करणार का? या प्रश्नावरही त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. आता भाऊबंदकीच्या या वादात राज ठाकरे उद्धव यांना काय उत्तर देतात याकडे राजकीय
वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मनसे असुरक्षित पक्ष
ज्या पक्षाच्या नेत्याला स्वत:च्या पक्षातच असुरक्षित वाटते असा देशातील एकमेव पक्ष असावा. नासके आंबे त्यांच्या पक्षात आहेत, आमच्याकडे नाही. त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका करू नये, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राज ठाकरे व मनसेवर टीका केली.
मुखर्जींना पाठिंबा ही सेनेची निवडणुकीतील परतफेड : राज ठाकरे
रालोआने सरळ योग्य रस्ता पकडावा : उद्धव ठाकरे
राज ठाकरेसुद्धा जेव्‍हा घाबरतात....!