आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Attack Master Mind Abu Jundal Live In Mumbai Mla House

मुंबईतील आमदार निवासात थांबला होता मास्टर माईंड अबु जुंदल!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर पकडण्यात आलेला मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा सूत्रधार कुख्यात दहशतवादी सैय्यद जबीउद्दीन अबू जुंदल उर्फ अबू हमजा हा आमदार निवासात थांबला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अबु जुंदल 9 मे 2006 रोजी मुंबईत थांबला होता ते घर आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांचे होते, अशीही खळबळजनक माहीती उघड झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहे.
दरम्यान, आपल्याला याप्रकरणी गृहमंत्रालयाने क्लिन चीट दिल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. अबु जुंदल नामक व्यक्तिस आपण ओळखत नसून कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याचेही खान म्हणाल्या. अबू जुंदलच्या अटकेनंतर फौजिया खान पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
अबूहा बीड येथील रहिवासी आहे. इलेक्ट्रीशियन विषयात त्याचे आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेत असतानाच तो सिमीच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याने कराचीला जाऊन दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात सक्रीय सहभाग घेतला होता. सध्या अटकेत असलेला दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या अन्य सहकार्‍यांबरोबर त्याने भारताच्या सीमेपर्यंत बोटीने प्रवास केला होता. कसाबला त्यानेच हिंदी भाषा शिकवली होती.
नरेंद्र मोदी होते अबू जुंदलच्‍या निशाण्‍यावर
जबीउद्दीनचा झाला अबू जिंदाल
अबू जिंदालचे कुटुंबिय बीडमधुन बेपत्ता, घराला कुलुप ठोकून पसार