आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाण पुन्हा गोत्यात; हॉटेलला वाढीव एफएसआय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘आदर्श’ घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामागील शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे दिसते. पदाचा गैरवापर करून चव्हाण यांनी एका हॉटेलला वाढीव एफएसआय देऊन पुर्नबांधणीसाठी परवानगी दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकार व दोन कंपन्यांना शुक्रवारी नोटीस बजावली.
सोनिया सूद यांच्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि मृदुला भटकर यांनी हा निकाल दिला.
सूद यांनी याचिकेत म्हटले आहे की, लुथरिया आणि लालचंदानी यांची मालकी असलेल्या इएचआयपीएल या खासगी कंपनीला 1961 मध्ये राज्य सरकारची कुलाबा येथील जागा 99 वर्षांच्या करारावर देण्यात आली. मात्र, आता हे हॉटेल नव्याने बांधण्यात येत आहे बांधकामात पर्यावरण नियमांचे उल्लंघन होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
पर्यावरण मंत्रालयाने या हॉटेलला 2.5 एवढा एफएसआय दिला आहे. मात्र मुंबई पालिकेने पर्यावरण मंत्रालयाचे आदेश डावलत 5.5 एवढा वाढीव एफएसआय मंजूर केला. 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी डीसीआर नियमांर्तगत 2.5 एफएसआयला मंजुरी दिली. तर 2009 मध्ये चव्हाण यांनी 3 एवढा वाढीव एफएसआय दिला, असे याचिकेत म्हटले आहे.
अशोक चव्हाणांच्या विरोधात राजकारण नाही : माणिकराव ठाकरे
‘आदर्श’ घोटाळा : अशोक चव्हाणांसह 13 जण आरोपीच्या पिंज-यात, 150 साक्षी तपासल्या
चव्हाण यांचे बोट महसूल सचिवांकडे
\'आदर्श\'ला मंजुरी अशोक चव्‍हाणांचीचः विलासराव ठाम