आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनोहरपंतांना पद देऊ नका, पण चांगली वागणूक द्या -उद्धवना सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहरपंत जोशींना एखादे मोठे पद देऊ नका पण किमान चांगली वागणूक द्या. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे बरं का? असे अनुभवाचे 'धडे' ज्येष्ठ संपादक नीलकंठ खाडिलकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हक्काने दिले. यावेळी उद्धव यांनी मान डोलावून त्यांच्या मतांशी सहमती दर्शविली. हे घडून आले गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात. नीलकंठ खाडिलकर यांच्या ‘महाभारतातील शहाणपण’ या पुस्तकाचे दिमाखदार समारंभात मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी खाडिलकर यांनी उद्धव यांना मोलाचे सल्ले दिले.
खाडिलकर म्हणाले, उद्धवजी मी तुम्हाला विनंती करणार आहे की पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहरपंत जोशींना भले काहीही पद देऊ नका पण त्यांना किमान चांगली वागणूक दिली पाहिजे. शरद पवार विरोधी पक्षातील नेते आहेत पण त्याच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. ते सकाळपासूनच कामाला सुरुवात करतात ते रात्रीपर्यंत कामच करतात. त्यांचा हा गुण शिकण्यासारखाच आहे ना, असे सांगत उद्धव यांना अनुभवाचे धडे दिले. सोबत होती खाडिलकर यांची खुमासदार शैली.
राणेंची सरांवर पुन्हा टीका- उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मनोहर जोशींवर टीकास्त्र सोडले आहे. छगन भुजबळ आणि त्यानंतर मी जेव्हा शिवसेना सोडली चेव्हा सेना अल्पमतात गेली होती, तेव्हा मनोहर जोशी यांच्या मनासारखे झाले होते, असे म्हटले आहे. दसरा मेळाव्यात मला हुसकावून लावण्यामागे सेनेतील काही लोकांचे षडयंत्र होते, यावर राणे म्हणाले, जोशी आणि षड‍्यंत्र हे समीकरणच होते. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत षड‍्यंत्र दिसते.
राणे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
आणखी पुढे वाचा.....