आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Dr. Manmohan Singh On Comment In Sammana By Shiv Sena Chief Balasaheb Thackeray

'मनमोहनसिंग जागतिक पातळीवर एक हास्यास्पद प्राणी'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'हिंदुस्थानचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग म्हणजे जागतिक पातळीवरील एक हास्यास्पद प्राणी बनला आहे. हिंदुस्थानातील मुका व बहिरा राष्ट्रीय प्राणी कोण?... तर मनमोहनसिंग!' अशा शेलक्या शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर 'सामना'मधील अग्रलेखातून टीका केली आहे.
अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘टाइम’ मॅगझिनच्या आशिया आवृत्तीच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे छायाचित्र ‘अंडरअचिव्हर’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आले होते. आर्थिक विकासाच्या आघाडीवर देशाची घडी बसवण्यासाठी सुधारणांच्या ठराविक मर्यादेपुढे जाऊन डॉ. मनमोहनसिंग धडाडीचे निर्णय घेऊ शकले नसल्याचे ‘टाइम’ने नमूद केले होते.
'नेते खुर्च्या उबवत आहे व त्यामुळे देश ज्या पद्धतीने अराजकाच्या वाटेवर निघाला आहे तो सर्वच प्रकार चिंतादायक आहे. 'टाइम' मॅगझिनने नेमके यावरच बोट ठेवले आहे. खरे म्हणजे फक्त आर्थिक धोरणांच्या बाबतीत नव्हे; तर मनमोहन सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहेत. धोरणे राबविण्यासाठी पंतप्रधांनाची इच्छाशक्ती कमी पडत असल्यामुळे हिंदुस्थानचा विकासाचा आलेख खालच्या बाजुला झुकला असल्याचे 'टाइम'ने म्हटले आहे.
'अंडर अचिव्हर' म्हणजे तरी काय? असा प्रश्न पडणार्‍या मराठमोळ्या वाचकांची समस्या बाळासाहेबांनी आपल्या खास 'ठाकरी' शैलीत सोडविली आहे. 'देशाचे पंतप्रधान हे राजकीयदृष्ट्या नपुंसक आहेत व म्हातारा नवरा गमतीला अशा त्यांची अवस्था झाली आहे', अशा शब्दात बाळासाहेबांनी मनमोहन सिंग यांची खिल्ली उडवली आहे.
टाइम मॅगझिनची पंतप्रधानांच्या कुवतीवर शंका
शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय प्रणव विजयी होणे शक्य नाही
बाळासाहेब ठाकरेंना आजही पाकिस्तानात टरकतात