आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pranab Win Possible Only With Sena, Jd(u), Support: Thackeray

शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय प्रणव विजयी होणे शक्य नाही- बाळासाहेब ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: केंद्रातील सत्तारुढ यूपीएचे राष्‍ट्‍पतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी शिवसेना आणि जद(यू)च्या पाठिंब्याशियाय त्यांचा विजय होणे शक्य नसल्याचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे.
देशाच्या राष्‍ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. एका बाजूला प्रणव मुखर्जी तर दुसर्‍या बाजूला एनडीएचा पाठिंबा असलेले पी.ए. संगमा आहेत.
दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले व त्यावेळेस शक्तिप्रदर्शन वैगरेही करण्‍याचा प्रयत्न केला. परंतु दोघांपैकी एकाही उमेदवाराकडे स्वबळावर, स्वत:च्या पक्षाच्या बळावर निवडून येण्याची क्षमता नाही. त्यामुळे उधारउसनवारीचे 'टेकू' लाऊन दोन्ही बाजूंकडून राष्‍ट्रपतीची निवडणूक लढवली जात आहे, असे बाळासाहेबांनी 'सामना'मध्ये म्हटले आहे.
प्रणव मुखर्जी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबतीस महाराणी सोनिया गांधी, सरदार मनमोहन सिंग, मौलाना मुलायमसिंग यादव, बिहारचे लालू यादव, रामविलास पासवान, द्रमुकचे टी.आर. बालू वगैरे लोक होते. पण सर्व लोक त्यांच्या बरोबर आहेत म्हणून प्रणवबाबू हमखास जिंकतील व राष्‍ट्रपती भवनात जातील असे गणित अजिबात नाही.
शिवसेना आणि जनता दल युनायटेड ने मुखर्जींच्या उमेदवारीस खुल्या दिलाने पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा विजय निश्चित‍ मानला जात आहे. मुखर्जींसारखा जुनाजाणता, अनुभवी, समतोल विचारांचा कठोर प्रशासक व देशाच्या राजकारची खडान् खडा माहिती असलेला नेता असल्यामुळे शिवसेनेसह शरद यादवांनी त्यांना पाठिंबा दिला, असेही बाळासाहेबांनी म्हटले आहे.
राष्ट्रपती भवनात गेल्यामुळे देशाचे नुकसान होण्याऐवजी फायदाच होणार आहे. सध्याची अस्थिरता आणि भविष्यातील गोंधळ, अराजकाच्या परिस्थितीवर मात करण्‍याची, योग्य निर्णय घेण्याची क्षमता फक्त प्रणवबाबूंतच आहे, असे सांगून बाळासाहेबांनी प्रणवदांच्या कार्यक्षमतेबाबतची पावतीही दिली आहे.
राष्‍ट्रपती निवडणूकः एनडीएमध्‍ये फूट, शिवसेनेचा बैठकीत सहभाग नाही?
'स्‍वत:च्‍या मर्जीने कोणीही राष्‍ट्रपती बनू शकत नाही'- प्रणव मुखर्जी