आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pranav Mukharji Meet Balasaheb Thakre On 13 July

बाळासाहेब, प्रणवदा भेट 13 जुलैला?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी 13 जुलै रोजी मुंबईत येत असून आघाडीच्या आमदारांबरोबर त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. या दौ-यात ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटणार असल्याचे वृत्त असून मुख्यमंत्र्यांनी मात्र याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.
मुखर्जी प्रचारासाठी 13 जुलै रोजी मुंबईत येत आहेत. त्यावेळेस आघाडीच्या सर्व आमदारांबरोबर सायंकाळी 6 वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अन्य काही राजकीय नेत्यांनाही ते भेटणार आहेत. प्रणवदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटणार का? या प्रश्नावर मात्र मुख्यमंत्र्यांनी मला काहीही ठाऊक नसल्याचे सांगितले. माझ्याकडे जो कार्यक्रम आला आहे त्यामध्ये असे काहीही नोंदलेले नाही. त्यामुळे आघाडीच्या आमदारांबरोबरच्या बैठकीबाबतच मी सांगू शकतो. बाकी मला काही ठाऊक नाही. दुसरीकडे शिवसेना सूत्रांनी सांगितले की, मुखर्जी आणि बाळासाहेबांची 13 जुलै रोजी भेट ठरली असून या भेटीत ते आभार
व्यक्त करणार आहेत.