आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताचे चुकीचे नकाशे; विकिपीडियाच्या संस्थापकांसमोर मुंबईत निदर्शने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विकिमॅपिया या संकेतस्थळावर चुकीचे आणि अपमानकारक पद्धतीने भारताचे नकाशे प्रसिद्ध करण्यात येत असल्याने विकिपीडियाच्या मुंबईत सुरू असलेल्या परिषदेसमोर शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. इंटरनेट विश्वात मोठे नाव असलेल्या विकिपीडिया संकेतस्थळाच्या तीन दिवसीय परिषदेची सुरूवात मुंबईत झाली. विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या परिषदेच्या पहिल्याच दिवशी अभाविपने निदर्शने करून आपला रोष प्रकट केला.
विकिमॅपिया या
संकेतस्थळावर भारताचे चुकीचे नकाशे दाखवल्याप्रकरणी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पससमोर निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर वेबसाईटवरील भारताचा चुकीचा नकाशा काढून टाकण्यात यावा अशी मागणीकेली. विकीमॅपियामध्ये अरुणाचल प्रदेशचा बहुतांश भाग चीनमध्ये समाविष्ट केल्याचं दाखवण्यात आला आहे.
लडाख-अरुणाचल प्रदेश दाखविला चीनमध्ये, चीनी राजदूताने पत्रकाराला म्हटले शट अप!
अरुणाचल सीमेवर तैनात होणार जगातील सर्वांत वेगवान क्षेपणास्त्र