आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackerey Criticizes Maharashtra Bjp Leaders

बेळगावप्रकरणी महाराष्‍ट्रातील भाजप नेत्‍यांचे मौन का? राज ठाकरेंचा सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सीमाभागात मराठी माणसांवर अत्याचार कशासाठी? कर्नाटकात भाजपचेच सरकार असताना हे होतेच कसे आणि महाराष्‍ट्रातील भाजप नेते गप्‍प का आहेत, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
बेळगाव महापालिका पुन्‍हा बरखास्‍त करुन आडमुठेपणा दाखविणा-या कानडी सरकारवर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे बरसले आहेत. या मुद्यावरुन त्‍यांनी महाराष्‍ट्रातील भाजप नेत्‍यांवरही तोंडसुख घेतले.
कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असताना सीमाभागातील मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत, याकडे राज यांनी लक्ष वेधले आहे. कोर्टाने बेळगाव पालिका बरखास्त करण्याच्या निर्णयाला अवैध ठरविले होते. सरकाचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले होते. तरीही सरकारने बेळगाव पालिका पुन्‍हा बरखास्त केली. यावरुन राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ते म्‍हणाले, मी माझ्या राज्यात काही बोललो तर कळीचा मुद्दा होतो. कर्नाटक सीमाभागातील मराठी माणसांची गळचेपी करत आहे. मी काही बोललो की लगेच प्रांतीयवादी ठरवले जाते. परंतु, कर्नाटक सरकारच्‍या या धोरणाबाबत केंद्र सरकारही गप्‍प आहे. महाराष्‍ट्राला एक न्‍याय आणि कर्नाटकला वेगळा, असे चालणार नाही. याप्रश्नी आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे
हायकोर्टाचा आदेश धुडकावला; बेळगाव पालिका पुन्हा बरखास्त
बेळगाव सिमा प्रश्न सोडवण्यासाठी स्वातंत्र्यदिनाची डेडलाइन