आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलासराव एक शाब्दिक ‘कोट्या’धीश- राजीव खांडेकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विलासराव प्रश्न टाळण्यातदेखील फारच हुशार आहेत. अडचणीचे प्रश्न आले की मिश्किलपणे ते पत्रकारांवर टोलवायचे. पत्रकारांशी मिश्किल शाब्दिक कोट्या करण्यात विलासराव पटाईत होते. ते पत्रकारांशी गप्पा मारत. गप्पांचे फड रंगवत.
विलासराव मुख्यमंत्री होते, तेव्हा नि जेव्हा नव्हते तेव्हाही पत्रकारांशी त्यांचे कायमच चांगले संबंध होते. मधल्या तीन वर्षांच्या काळात ते पत्रकारांपासून लांब गेले होते, तेव्हा पत्रकार परिषदाही त्यांनी कमी केल्या होत्या. तेव्हाही पत्रकारांशी त्यांचा संबंध कमी झाला नव्हता. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अनेक पत्रकारांना नावाने ओळखत. हा पत्रकार कोणत्या विचारांचा आहे, तो काय बातमी देणार हेदेखील त्यांना ठाऊक असायचं. कोणत्या वेळी कोणत्या पत्रकाराकडे बातमी प्लान्ट करायची हे त्यांना बरोबर कळत असे. जसा आमिर खान त्यावर पिक्चर प्रदर्शित होण्याच्या वेळी बरोबर पत्रकारांसाठी उपलब्ध होतो तद्वतच विलासरावांचंदेखील पत्रकारांशी नातं होते. विलासरावांचा मोबाइलदेखील सर्वच पत्रकारांकडे असायचा. त्याचे फायदे-तोटे असतील, पण त्याचा राज्यकर्त्या विलासरावांना चांगलाच उपयोग व्हायचा. याचं उदाहरण म्हणजे मागे विदर्भात दंगल सुरू होती, तेव्हा तिथल्या एका शेख नावाच्या पत्रकाराने विलासरावांना कळवलं. तेव्हा विलासरावांनी तत्काळ डीजींना फोन केला. गंमत म्हणजे डीजींना या दंगलीची कल्पना नव्हती. तेव्हा तत्काळ त्यांनी कारवाई करून दंगल थांबवली. असंच दुसरं उदाहरण देता येईल. मागे औरंगाबादमध्ये गरीब कुटुंबांना घरं देताना कुणी तरी पैसे मागत होते. तेव्हाही एका ग्रामीण पत्रकाराने थेट फोन करून विलासरावांना कळवलं. तेव्हा विलासरावांनी फोन करून जिल्हाधिका-यांना कळवलं आणि ते प्रकरण थांबवलं. तसं पाहिलं तर आपल्या सेलवर दिवसभरात किती कॉल येतात, परंतु विलासरावांचा तो कॉल अटेंड करण्याचा गुणही विलक्षण वेगळा होता. विलासराव प्रश्न टाळण्यातदेखील फारच हुशार आहेत. अडचणीचे प्रश्न आले की, मिश्किलपणे ते पत्रकारांवर टोलवायचे. पत्रकारांशी मिश्किल शब्दिक कोट्या करण्यात विलासराव पटाईत होते. ते पत्रकारांशी गप्पा मारत. गप्पांचे फड रंगवत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वच पत्रकारांशी ते चांगले संबंध ठेवून होते ते त्यामुळेच. आमच्या स्टार माझा या वृत्तवाहिनीवर निवडणुकीच्या काळात सादर झालेल्या गंगूच्या (निर्मिती सावंत) सर्व प्रश्नांना अगदी उत्तम पद्धतीने उत्तरे दिली. अर्थात या उत्तरांमधून त्यांच्यातील मुरब्बी राजकारण्याची साक्षच पटली. शिवाय हजरजबाबीपणाही तितकाच होता. ते शब्दात कधीच अडकत नाहीत. ते सहज निसटतात. विलासरावांचा आणखी एक खास गुण म्हणजे ते समोरच्याला कधीच निरुत्तर करत नाहीत आणि अपमान तर ते कधीच कुणाचा करत नाहीत. हसत-हसत खिल्ली उडवणे हे ते करत असत.