आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- भोजपुरी अभिनेत्री रुबी सिंग ( वय २५) हिने आपल्या गोरेगाव (वेस्ट) येथील राहत्या घरात आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
रुबीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये, असे त्यात म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबी निराशग्रस्त झाली होती. तसेच गेल्या वर्षीही तिने बिहारमध्ये झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. रुबीचे आई-वडिल पाटणा येथे राहत असून तिचे वडील पोलिस उपअधिक्षक आहेत.
रुबी एमएमआरडीए कॉलनीत एकटीच राहत होती. पाटण्यातील रुबीच्या शेजारी राहणारा रोहित गुरुवारी रुबीला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी निराशाग्रस्त दिसत होती. तसेच तिच्याकडे झोपेच्या गोळ्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर रोहितने रुबीच्या आईला फोन करुन याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी तिच्यात व आईत बराच वेळ मोबाईलवर बोलणे झाले. त्यानंतर रुबी व्यवस्थित झाल्याचे पाहून रोहित तिच्या फ्लॅटवरुन निघून गेला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी रुबीला जेव्हा फोनवरुन संपर्क करु लागला त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर रोहित रुबीच्या फ्लॅटवर आला त्यावेळी तिने पंख्याला गळफास घेतल्याचे लक्षात आले.
चित्रपट निर्माता ओ.पी. दत्ता कालवश
टीव्ही अभिनेत्री रुबिना शेरगिलचे निधन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.