आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadhvi Pradnya Singh Mother Meets Sadhvi In Byculla Jail

माझी मुलगी निर्दोषः साध्‍वी प्रज्ञा सिंगच्‍या आईचा टाहो

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग निर्दोष असल्‍याचे मत त्‍यांच्‍या आईने व्‍यक्त केले आहे. माझ्या मुलीला खोट्या आरोपाखाली अडकवण्यात आले असून तिच्यावर तसे संस्कारही नाहीत, असे प्रज्ञा सिंग यांची आई सरला देवी यांनी म्‍हटले आहे. सरला देवी यांनी भायखळ्याच्या महिला तुरुंगामध्ये साध्‍वीची भेट घेतली. त्‍यावेळी त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सरला देवी कॉंग्रेस सरकारवर टीका करताना म्‍हणाल्या, कॉँग्रेस सरकारने मुलीला तुरुंगात टाकले आहे. तर तर साधा किडाही मारू शकत नाही. तिची प्रकृती व्यवस्थीत नसताना महाराष्‍ट्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. राष्‍ट्रपती आणि राष्‍ट्रीय मानवाधिकार आयोगाला या संदर्भात पत्र लिहिले आहे, मात्र त्याची अद्याप दखल घेण्यात आली नसल्याची खंतही त्‍यांनी व्‍यक्त केली.
29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंग, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्यात आली आहे. स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी झाले होते.
मालेगाव स्फोटातील ७ आरोपी अखेर कारागृहातून बाहेर
मालेगाव स्फोटातील आरोपीला पोलिसाने केली आर्थिक मदत
साध्‍वी प्रज्ञा सिंगचा जामीन अर्ज सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळला