आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार धूर्त राजकारणी! 'राष्ट्रवादी'तील मित्र मतदान करतील; संगमा यांचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रपतिपदासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीच संगमांना रिंगणात उतरवले असल्याचे बोलले जाते. याबद्दल थेट प्रतिक्रिया न देता 'पवार किती धूर्त राजकारणी आहेत हे आपल्याला माहीतच आहे', असे सांगत 'रालोआ'चे उमेदवार पी. ए. संगमा यांनी मूळ मुद्दय़ाला बगल दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मित्र आपल्याला सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
संगमा मंगळवारी राष्ट्रपतिपदाच्या प्रचारार्थ मुंबईत होते. भाजपने दिलेल्या पाठिंब्याबद्दल नेत्यांचे आभार मानण्यासाठी ते आले होते. येथे पत्रकार परिषदेत बोलताना संगमा म्हणाले, मुंबईत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना मतदानासाठी आवाहन करायचे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली नाही तरी काही 'चॅनल्स'च्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.
पवारांचे मानले आभार : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण अनेक वर्षे होतो असे सांगून शरद पवार यांचे संगमा यांनी आभार मानले. आपण स्वतंत्र उमेदवार असल्याचे सांगून प्रणव मुखर्जी हे पण काँग्रेसचे नव्हे तर स्वतंत्र उमेदवार असल्याचे त्यांनी नमूद केले.
.. तर हकालपट्टी केली असती!- सलमान खुर्शीद यांनी काँग्रेस दिशाहीन असल्याचे म्हटले आहे. याबद्दल विचारले असता संगमा म्हणाले, मी पंतप्रधान असतो तर त्यांची हाकालपट्टी केली असती. याच वेळी व्यासपीठावर बसलेले भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी मात्र खुर्शीद यांनी काँग्रेसची सत्य परिस्थिती समोर आणली असल्याचे भाष्य केले.
पूर्णो संगमा : हरणार नक्की, तरीही रिंगणात
अ-पूर्णो संगमा ! (अग्रलेख)
ओबामा राष्ट्राध्यक्ष बनू शकतात तर मी का नाही? - संगमा