आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परांजपेंना शिवसैनिक कदापि माफ करणार नाहीः सरनाईक यांची टीका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या व्‍यासपीठावर गेल्‍यानंतर शिवसेनेकडून संताप व्‍यक्त करण्‍यात येत आहे. ठाण्‍यातील शिवसेनेच आमदार प्रताप सरनाईक यांनी परांजपे यांच्‍यावर तीव्र नाराजी व्‍यक्त करताना शिवसैनिक परांजपे यांना कदापि माफ करणार नाही. त्‍यांचे ठाणे-कल्‍याणमध्‍ये कशा प्रकारे स्‍वागत करावे, याचा विचार शिवसैनिक करीत असल्‍याचा इशाराही दिला. आनंद परांजपे हे आर्थिक फायदा पाहून राष्‍ट्रवादीच्‍या वाटेवर जात असल्‍याची टीकाही सरनाईक यांनी केली. परांजपे यांना शिवसेनेमध्‍ये जेवढे प्रेम शिवसेनेमध्‍ये मिळत होते, ते कुठेही मिळणार नाही. आज त्‍यांनी जी पद्धत अवलंबली, ती अत्‍यंत चुकीची आहे. परांजपे हे अनेक दिवसांपासून संभ्रमावस्‍थेत होते. महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेमध्‍ये जावे की राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये, याबाबत त्‍यांच्‍या मनात चलबिचल सुरु होती, असे सरनाईक म्‍हणाले. सरनाईक यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्‍हाड यांच्‍यावरही टीका केली.