आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांद्रे सी लिंकच्या सल्ल्यासाठी सरकारने मोजले 33 कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाते. वांद्रे वरळी सी लिंकच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागाराला 33 कोटी 43 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभेत दिली.
राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विविध प्रकल्पासांठी सल्लागारांची नियुक्ती करून त्यावर कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केला. तसेच अनेकदा चुकीच्या सल्ल्यामुळे शासनाचे नुकसान झाल्याचे सांगून सल्लागार नेमणाºया सरकारकडे सक्षम अधिकारी नाहीत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. क्षीरसागर म्हणाले की, मनुष्यबळ कमी असल्याने सल्लागारांची नियुक्ती करावी लागते. राज्यात रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचे व्यवस्थापन, आराखडे, वाहतूक सर्वेक्षण, तसेच कर आणि विधी विषयक बाबींसाठी 106 सल्लागारांची नियुक्ती असून त्यासाठी वर्षभरात सुमारे 30.55 कोटी रूपये खर्च झाल्याचेही त्यांनी सांगितले.
क्रांतीचौक प्रकरणी 36 लाख वसूल- सल्लागारांनी दिलेले सल्ले चुकल्यास आणि त्यामुळे शासनास नुकसान सोसावे लागल्यास त्याचा दंड संबंधितांकडून घेतला जातो. औरंगाबाद क्रांती चौक येथील पुलाचा आराखडा चुकल्याने बांधकाम पाडावे लागले होते याबाबत संबंधित कंपनीकडून 36 लाख रूपये वसूल केल्याचे ते म्हणाले.