आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Special Police Team For 26 11 Terrorist Abu Jindal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अबू जिंदालसाठी विशेष पथकाची नियुक्ती; 31 जुलैपर्यंत कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी सय्यद झबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदालच्या चौकशीसाठी पोलिस अधिकार्‍यांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 26/11 प्रकरणाची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांचा यात समावेश आहे.
विशेष चौकशी पथकाला अन्य तीन पथक सहकार्य करणार आहेत. तीनपैकी एक पथक कागदपत्रांशी संबंधीत कामात असेल. अन्य दोन पथके राज्यबाहेरच्या तपास कामात सहभागी होतील, अशी माहिती सहपोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनी दिली. जिंदालचे जेवण व सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे निगराणी करण्याचे काम अन्य एका पथकावर सोपवण्यात आले आहे. आमच्या पथकाने त्याची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान पोलिस मुख्यालय परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या कोठडीनजिक गुन्हे शाखा, धडक कृती दलाचे कमांडो तैनात केले आहेत. चौकशी सुरळीत पार पडावी यासाठी 50 पोलिस कर्मचारी तैनात आहेत. जिंदालची वैद्यकीय तपासणी आज करण्यात आल्याची माहिती रॉय यांनी दिली. अटक होण्यापूर्वी जिंदाल कुठे होता, तसेच त्याचा दहशतवादी संघटनांशी संपर्क कसा आला, तसेच 26/11 हल्ल्याबाबत त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई पोलिसांना मिळणार अबू जुंदलचा ताबा
भारताला हवा असलेला अबू हमजा जिवंत नाहीः जबिउद्दीनचा खुलासा
अबू जुंदलचा साथीदार फसीहला सौदी अरबमध्‍ये अटक
अबू जिंदाल हा अबू हमजा नव्हेच!