आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुझान रोशन सजवणार शाहरुखचा मन्नत बंगला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वांद्रे बँडस्टँड येथे समुद्रासमोर उभ्या असलेल्या बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याच्या अंतर्गत सजावटीचे काम अभिनेता हृतिक रोशनची पत्नी सुझान करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती आठवडाभरात या बंगल्याच्या सजावटीचे काम सुरू करणार आहे.
सुझान आणि शाहरुखची पत्नी गौरी या जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे जेव्हा गौरीने आपल्या घराच्या सजावटीचा निर्णय घेतला, तेव्हा साहजिकच ते काम सुझानकडे देण्याचे ठरले. इंटेरियर डिझायनिंगच्या क्षेत्रात तिच्या नावाचा चांगला दबदबा आहे. तसेच, घराविषयी गौरीच्या आवडीनिवडी माहिती असल्यामुळे सुझानने आपणच या घराच्या सजावटीचे काम करणार असल्याचा आग्रह धरला होता. त्याला शाहरुखनेही मान्यता दिली. अर्थात शाहरुखपेक्षा गौरी आपल्या घराच्या सजावटीविषयी दक्ष असल्यामुळे तिच्या अभिरुचीप्रमाणे सुझान या घराचे रुपडे पालटणार आहे. दरम्यान 'मन्नत'च्या प्रवेशद्वाराला मात्र अजिबात धक्का लावण्यात येणार नाही. पण, मुख्य बंगल्याची अंतर्गत सजावट व त्यापाठीमागील मोठ्या इमारतीचा मात्र चेहरामोहरा पालटण्यात येणार आहे.