आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Abu Hamaza Involved In Indian Bomb Blast After 2008 By Information Ats

जबीउद्दीन अन्सारीच्या ओळखीबाबत संशय ; डीएनए चाचणीवरही सवाल!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: दिल्ली पोलिसांच्या अटकेत असलेला दहशवादी जबीउद्दीन अन्सारी अबू जिंदाल उर्फ अबू हमजाच्या ओळखीबाबत संशय निर्माण झाला आहे. जबीउद्दीनची घेण्यात आलेल्या डीएनए चाचणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जबीउद्दीनची डीएनए चाचणी झाली नसल्याचे आरोप त्याची आई रेहाना बेगमने केला आहे.
अटकेतील अबू अन्सारी आणि अबू जिंदाल हे वेगवेगळे असल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान मलिक यांनी सांगितले होते. त्यामुळेही जबीउद्दीनच्या डीएनए चाचणीवर प्रश्नच‍िन्ह उपस्थित झाले होते. विशेष म्हणजे पाकिस्तान आणि जबीउद्दीनचा काही एक संबंध नसल्याचे सांगून पाक सरकारने हात वर केले असले तरी जबीउद्दीन एकामागून एक धक्कादायक जबाब नोंदवत आहे.
लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी जबीउद्दीनने विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यासारखा भारतात करणार होता. त्याने त्यासाठी तयारीही सुरू केली होती. देशातील उंच इमारती आणि मोठी धरणे त्याच्या निशाण्यावर होती. तर भारतात 2008 नंतर झालेल्या बॉम्ब स्फोटात जबीउद्दीनचा हात असल्याचा दावा महाराष्‍ट्र एटीएसने केला आहे. एटीएसच्या सूत्रांनुसार, विदर्भातील आठ तरुणांना यासाठी पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले होते. देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे जबीउद्दीनचा हात होता.
बीड येथील रहिवासी असलेल्या जबीउद्दीन याने इलेक्ट्रिशियन विषयात आयटीआय केला होता. सध्या तो दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. जबीउद्दीनची एनआयएकडूनही चौकशी करण्यात येणार आहे.
जबीउद्दीनला अटक झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी 25 जूनला जाहीर केली होती. यापूर्वी जबीउद्दीन याची डीएनए चाचणी करण्यात आली होती. परंतु, जबीउद्दीन अन्सारीची आई रेहाना बेगम यांनी या डीएनए चाचणीबाबत सवाल उपस्थित केला आहे. जबीउद्दीनच्या कुटुंबातील एकाही सदस्याचा नमुना न घेता ही डीएनए चाचणी झालीच कशी? असाही प्रश्न रेहाना बेगम यांनी उपस्थित केला आहे.

'अटकेतील अबू जिंदाल माझा मुलगा नाही, जबी दहशतवादी असू शकत नाही'
9/11 सारख्या हल्ल्याच्या तयारीत होता अबू हमजा
चोराच्या उलट्या बोंबा: अबू हमजा आणि पाकचा काही संबंध नाही- मलिक