आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्काळ तिकीटांचा अवैध धंदा ? रद्द पीएनआरवर टीटीई तयार करतात नवे तिकीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जेव्हा कुंपणच शेत खायला लागते तेव्हा काय करणार, अशीच अवस्था सध्या रेल्वेची झाली आहे. ज्या तिकीट तपासनीसांवर (टीटीई) अवैध प्रवास करणा-यांना दंड करण्याची जबाबदारी आहे तेच, प्रवाशांकडून अवैधरित्या पैसे घेवून रेल्वेला चुना लावत आहेत. असा खुलासा दक्षता पथकाच्या छाप्यात झाला आहे. तिकीट तपासणीस (टीटीई) प्रथम वर्गाच्या सीट विकत आहेत आणि बनावट तत्काळ तिकीट तयार करण्याच्या अवैध धंद्यात सहभागी असल्याचे या छाप्यात समोर आले आहे.
मध्यरेल्वेच्या दक्षता विभागाकडून तिकीट तपासणी कर्मचा-यांच्या कारनाम्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावरुन स्पष्ट होते की टीटीई हे अवैध तिकीट विक्रीच्या काळ्या धंद्यात सहभागी आहेत. या अहवालात म्हटले आहे की, प्रतिक शर्मा या टीटीईने प्रवासाच्या तारखेआधी पाच दिवस रद्द करण्यात आलेल्या पीएनआर क्रमांकावरुन तत्काळ तिकीट तयार केले होते. मुंबईच्या वांद्रे टर्मिनस येथील हा टीटीई या काळ्या धंद्यात सहभागी असल्याचे आणखीही पुरावे अहवालात दिले गेले आहेत.
रेल्वे तिकीट आणि रेल्वे प्रवासादरम्यान होत असलेल्या काळ्या धंद्याची यादी फार मोठी आहे. या अहवालात द्वितीय श्रेणीच्या तिकीटावर प्रथम श्रेणीच्या कक्षात प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी दादर स्थानकावरील तिकीट तपासणीस कर्मचारी हे अवैधरित्या पैसे उकळत असल्याचे म्हटले आहे.
अशा तक्रारी दक्षता विभागाकडे आल्यामुळे त्यांनी छापेमारी केली, यात अनेक टीटीई त्यांच्या जाळ्यात अडकले आहेत.
रेल्वे कर्मचा-यांचे वेतन कापण्याची तयारी!
महिला रेल्वे कर्मचाऱयाने ऑफिससमोरच स्वत:ला जाळले!
वर्ष २००३ च्या तुलनेत आजही रेल्वे भाडे ४८ टक्के स्वस्त !