आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जबरदस्तीचे लोकपाल नकोच: उद्धव ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नवीन लोकपाल विधेयक आणण्यापेक्षा आहे ती यंत्रणा मजबूत करून जबरदस्तीने लोकपाल विधेयक तयार करण्यास सांगणे आणि तसे विधेयक पास करणे हा लोकशाहीवर घाला असल्याचे मत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सोमवारी एका कार्यक्रमात व्यक्त केले.
वरिष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकरद्वारा लिखित ‘दिवस असे की’ आणि ‘नोंदी डायरी नंतरच्या’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे आणि ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, पत्रकार आणि राजकारण्यांचे संबंध चांगले असले पाहिजेत. पत्रकारांनी राजकारण्यांना झोडपून काढण्यापेक्षा चांगले काम करण्यासाठी सल्ले दिले पाहिजेत असेही सांगितले. कुमार केतकर यांनी लोकपाल विधेयकाला शिवसेनेने विरोध केल्याबद्दल अभिनंदन करून म्हटले की, उशिरा का होईना शिवसेनेने लोकपाल विधेयकाला विरोध केला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. शिवसेना हा देशातील पहिला राजकीय पक्ष आहे ज्याने लोकपालला जाहीररीत्या विरोध केला असेही केतकर म्हणाले.