आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट चकमक करून ते मला ठार मारतील-अबू सालेम

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: मुंबईचे पोलिस व सीबीआयच्या पथकाकडून माझ्या जिवाला धोका आहे. बनावट चकमक करून ते मला ठार मारतील, अशा आशयाची तक्रार अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमने मुंबई उच्च न्यायालय व विशेष टाडा न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान, त्याच्या पत्रात दखल घेऊन उच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस पाठविली असून या तक्रारीबाबत आपले म्हणणे सात दिवसांत मांडण्याचे आदेश दिले आहेत.
बनावट पासपोर्ट प्रकरणात 2006 मध्ये पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आलेल्या सालेमचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले असून तो तळोजा तुरुंगात आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील तो एक महत्त्वाचा आरोपी आहे. पोर्तुगालमधील न्यायालयाने नुकतेच सालेमचे प्रत्यार्पण रद्द ठरवले आहे. त्यामुळे आपल्याविरुद्धचे गुन्हे रद्दबातल ठरवण्यात यावेत, अशी मागणी त्याने टाडा न्यायालयाला केली होती. पण, आपल्या मागणीच्या पुष्टीसाठी त्याने सबळ पुरावे दिले नसल्याचे सांगत न्यायालयाने त्याचे म्हणणे फेटाळून लावले.
सालेमने उच्च न्यायालयास पत्र पाठवून आपल्या जिवाला तुरुंगात धोका असल्याचे म्हटले आहे. सीबीआय किंवा पोलिस अधिकारी मला खोट्या चकमकी दाखवून किंवा इतर कोणतेही कारस्थान रचून मला जिवे मारतील, अशी भीतीही त्याने पत्रात व्यक्त केली आहे.
अबू सालेम लवकरच दिसणार ‘तमाशे’ या हिंदी चित्रपटात