आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: असे होते विलासराव...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमोघ वक्तृत्वाची देण लाभलेले फर्डे वक्ते, लोकसंग्राहक विलासराव देशमुख यांनी राजकीय रंगमंचावरून घेतलेली अचानक एक्झिट सबंध महाराष्ट्राला रुखरुख लावणारी ठरली. बाभळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री असा विलासरावांचा प्रवास महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याच राजकीय पटलावर वेगळा ठसा उमटवणारा ठरला.
जन्म : 26 मे 1945, जन्मगाव : देशमुख गढी, बाभळगाव, तालुका-जिल्हा लातूर
शिक्षण : बी.एस्सी. (गरवारे महा., पुणे 1960)
बी.ए. (गरवारे महा., पुणे 1964)
एलएल.बी. (आयएलएस विधी महा.)
वडील : दगडोजीराव, आई : सुशीलादेवी, पत्नी : वैशाली, 29 मे 1975 रोजी विवाहबद्ध , मुले : अमित (केमिकल इंजिनिअर व लातूरचे आमदार), रितेश आणि धीरज.