आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Video Recording Of Mantralaya Fire Says Prithviraj Chavan

मंत्रालयातील आगीत जळालेल्या सर्व विभागांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार - मुख्यमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्याच्या मंत्रालयाला गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांची कार्यालये जळून खाक झाले आहेत.
मंत्रालयामध्ये लागलेल्या आगीचे कारण शोधण्यासाठी तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून शुक्रवारी इमारतीचे स्टक्चरल आणि फायर ऑडिट करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी सायंकाळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तसेच आगीत जळलेल्या सर्व विभागांचे उद्या व्हिडिओ कॅमे-याच्या माध्यमातून शूटींग होणार असून त्यामुळे नुकसान काय झाले याची कल्पना येऊ शकेल, असे ते म्हणाले.
मंत्रालयातील काही खाती आता विधानभवन, सह्याद्री अतिथीगृह, मंत्रालयाचा विस्तारीत भाग याठिकाणी हलवण्यात येणार आहेत. तसे आदेश संबंधित विभागांच्या सचिवांना दिले असून उद्यापासून ही कारवाई सुरू होईल.
आगीमध्ये भस्मसात झालेल्या फाईल्स आणि कागदपत्रे यांचीही माहिती संबंधित विभागाचे अधिकारी घेतील.
मंत्रालयाचे कामकाज उद्या सुरू राहणार असले तरी फक्त कर्मचारी आणि अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात येईल. बाहेरून कामासाठी येणा-या लोकांना प्रवेश मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सहाव्या मजल्यावर ६० ते ६५ लोक अडकलेले होते त्यांना फायर ब्रिगेडच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले आहे. १६ जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
VIDEO : मंत्रालयाला भीषण आग; महत्वाची कागदपत्रे खाक