आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Would Like To Have Tea With Balasaheb On July 13: Pawar

बाळासाहेब ठाकरे- प्रणवदा भेटीदरम्यान शरद पवारांची 'TEA DIPLOMACY'ची इच्छा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे की, येत्या १३ जुलैला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मला चहा प्यायला आवडेल, जेव्हा यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी हे ठाकरे यांची भेट घेतील.
मुखर्जी यांना संयुक्त जनला दल, शिवसेनेसह अनेक पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांनी विविध पक्षांशी व त्यांच्या नेत्यांशी भेटले पाहिले व चर्चा केली पाहिजे. मी स्वत सीपीएम व टीआरएस यांच्या नेत्यांना भेटलो. २००७ साली शिवसेनेने यूपीएच्चाच उमेदवाराला पाठिंबा दिला होता याची आठवण पवार यांनी करुन दिली. मुखर्जी आणि ठाकरे यांच्या भेटीदरम्यान मातोश्रीवर जाण्यास आवडेल का यावर पवार म्हणाले, येत्या १३ जुलैला बाळासाहेबांबरोबर मला चहा प्यायला आवडेल.
लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात येणार असल्याबाबत पवार यांनी स्पष्टीकरण दिले की, शिवसेनेकडून जोशी यांच्या नावाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.
उपराष्ट्रपतीपदाबाबत यूपीएचा सर्वात मोठा घटक पक्ष असलेला काँग्रेसच निर्णय घेईल. तसेच मुखर्जी यांना शिवसेनेने पाठिंबा देण्यामागे आपली काहीही भूमिका नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या २-३ दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबई शहराचा अध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.
पवारसाहेबांच्या अधिका-यांनी चहापानावर उडविले एका वर्षात २१ लाख रुपये
राष्ट्रपती निवडणूक - प्रणवदांना ममता पाठिंबा देतील - शरद पवार
शरद पवार यांची चौकशी 25 वर्षांतही होणार नाही - अण्णा हजारे
यूपीए सरकार अस्थिर, वाजपेयींचा काळ बरा - शरद पवार