आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येडियुरप्पा हे तर भाजपमधील मानवी बॉम्ब- बाळासाहेब ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे भाजप पक्षातील मानवी बॉम्ब आहेत. याचबरोबर भाजपमध्ये अध्यक्ष नितीन गडकरी यांचा मार्ग खडतर असून येड्डिसारखे त्यांच्या मार्गात सुरुंग पुरण्याचेच काम करीत आहेत, अशी टीका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे.
भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीत गुजराचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहभागी होण्यास नकार दिला होता. कारण पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी त्यांच्या जवळचे मित्र व नागपूरचे संजय जोशी यांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यांना पक्षात घेतल्याने मोदी ब-याच कालावधीपासून नाराज होते. तसेच पक्षाच्या राष्ट्रीय घडामोडीत सामील होत नव्हते. त्यामुळे त्यांची नाराजी ओळखून गडकरी यांनी जोशी यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.
तो मुद्दा घेऊन बाळासाहेब ठाकरे म्हणाले, भाजपात आता नरेंद्र मोदी यांची चलती आहे. तर अडवाणी यांची राजकीय वाटचाल आता अस्ताकडे होत आहे. मोदींशिवाय भाजप आता राजकारण करु शकत नाही. तसेच राग-लोभास महत्त्व आहे हे जोशीच्या राजीनाम्याने स्पष्ट झाले आहे.
येडियुरप्पा यांनी मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे जाहीर केल्याबाबत बाळासाहेब म्हणाले, येडियुरप्पा हे भाजपमधील मानवी बॉम्ब आहेत. ते कधी काय करतील आणि पक्षासह स्वतलाही अडचणीत आणतील त्याचा नेम नाही. गडकरी जरी घटना दुरुस्ती करुन दुस-यांदा राष्ट्रीय अध्यक्ष होणार असले तरी मार्ग सोपा नाही. त्यांचा मार्ग खूप खडतर असून पक्षातील लोकांनी त्यांच्या मार्गात सुरुंग पुरुन ठेवले आहेत, असे भाकीतही केले.
गडकरी आणि मोदी हे राज ठाकरे यांच्या अधिक जवळ असल्याने मागील काही दिवसापासून शिवसेनेने विशेषत बाळासाहेबांनी गडकरी आणि मोदी यांच्यावर निशाना साधण्याची एकही संधी सोडलेली नाही. आताही संधी मिळताच त्यांनी मोदी, गडकरीसह संघातील येडियुरप्पा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
बाळासाहेब ठाकरेंना आजही पाकिस्तानात टरकतात
पेट्रोल दरवाढीविरोधात देशभर वणवा पेटवाः बाळासाहेब गरजले
शाहरुखच्‍या वादाला धर्माचा रंग चढविणा-या लालुंवर बाळासाहेब बरसले