आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get Information Of Doctors Medicines On Mobile Through Sms

तंत्रज्ञान - आता एसएमएसने मिळणार औषधांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - डॉक्टरांकडून लिहून दिल्या जाणार्‍या औषधांची संपूर्ण माहिती आता एका एसएमएसद्वारे सहज मिळणार आहे. ऑल इंडिया केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.
वैद्यकीय क्षेत्रात रोज नवनवीन कंपन्यांची औषधे बाजारात उपलब्ध होत असतात. एमआर यांच्या माध्यमातून डॉक्टरांच्या भेटी घेऊन त्यांना औषधांची माहिती उपलब्ध करून दिली जाते. त्यानुसार डॉक्टर हे रुग्णांना औषधे लिहून देतात; मात्र इतरही अनेक औषधे बाजारात येतात व त्याबाबतची माहिती डॉक्टर आणि औषधविक्रेत्यांना असतेच असे नाही. तसेच कंपनीच्या कोणत्या औषधामध्ये कण्टेंट कसे आहे हेही माहिती नसते. त्यामुळेच ऑल इंडिया केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने एसएमएसद्वारे औषधांची संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली असून, अनेक डॉक्टर आणि औषधविक्रेते या सेवेचा फायदा घेत आहेत.
केवळ एसएमएस केला की, औषध कोणत्या कंपनीचे आहे, त्यातील घटक, किंमत, त्याला समतुल्य औषध कोणते याबाबतची संपूर्ण माहिती आता काही क्षणात मिळणार आहे. दरम्यान, बर्‍याच रुग्णांनाही औषधांची माहिती जाणून घेण्याची इच्छा असते; पण तेवढा वेळ ते डॉक्टरांशी बोलू शकत नाहीत. या एसएमएस सुविधेने ही माहिती त्यांना आता सहज कळू शकेल.
सुविधेसाठी वार्षिक शुल्क - या सुविधेसाठी संघटना वार्षिक 600 रुपये शुल्क आकारते. नोंदणीनंतर सेवा सुरू झाल्यानंतर एसएमएस केल्यावर ही सेवा मिळते. जळगावमध्येही संघटनेने केमिस्ट भवन येथून दूरध्वनीद्वारे ही सेवा सुरू केली आहे. केमिस्ट भवनच्या क्रमांकावर कॉल केल्यास असोसिएशनतर्फे औषधांविषयीची माहिती, कोणत्या विक्रेत्याकडे औषध उपलब्ध आहे, घटक कोणते, वितरकाच्या नावाची माहिती या सेवेत मिळते.
औषधांची मिळते सहज माहिती
- ही सुविधा रुग्णांसाठी लाभदायी तर असोसिएशनसाठीही उपयुक्त आहे. केमिस्ट असोसिएशनच्या दूरध्वनीद्वारे कुठल्याही औषधांची माहिती सहज उपलब्ध करून दिली जाते. एसएमएस सुविधेचा लाभ अनेक औषधविक्रेते व डॉक्टर घेतात.सुनील भंगाळे, अध्यक्ष, केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन