आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीवरील कार्टून मालिका बच्चे कंपनीला घालताहेत भुरळ; अनुकरणावरही देताहेत भर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - सध्या उन्हाळी सुटीचे दिवस असल्यामुळे लहान मुलांची मौजमजा सुरू आहे. चार वर्ष वयोगटापासून ते 10 वर्ष वयोगटातील लहान मुले टीव्हीसमोरच बसलेली दिसतात. पोगो, सीएनए या चॅनलवर लहान मुलांसाठी कार्टूनचा खजिनाच भरला आहे. त्यामुळे घरात सध्या बच्चे कंपनी कार्टून पाहण्यात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे. आता घराघरात ‘छोटा भीम’ हा लहान मुलांचा हीरो बनला आहे. ‘मै हुँ छोटा भीम’ असे संवाद घराघरातील बालकांमध्ये रंगू लागले आहेत.
पूर्वी उन्हाळी सुटी लागली की मुले मामाच्या गावाला जात असत. मात्र, सध्या एका पोगो, सीएनए चॅनलवरील छोटा भीम हे पात्र या कार्टून मालिकेने चिमुकल्यांच्या मनावर भूरळ घातली आहे. या चॅनलवर दिवसभर कार्टूनचे एक से बढकर एक मालिका सुरू असते. त्यामुळे लहान मुले डीश टीव्हीसमोरच तासन्तास बसून कार्टून पाहण्यात दंग असतात. घरात नेहमीच सुरू असलेल्या कार्टून मालिकांमुळे बच्चे कंपनीची मजा आहे. परंतु दिवसभर बच्चे कंपनी या मालिका पाहण्यात मग्न असल्याने पालकवर्ग मात्र परेशान झाला आहे. कार्टून मालिकेत छोटा भीम हे पात्र अन्यायाविरुद्ध लढणारे दाखविण्यात आले आहे. अशा मालिका पाहून अनेक मुले ‘मै छोटा भीम हुँ ' असे म्हणून एक दुस-याला मारहाण करत असल्याचे चित्र आहे. मुलांना या नाटकातील संवाद अधिक आवडू लागले आहेत.
छोटा भीम आवडता हीरो - सुटी असल्याने लहान मुलांना कार्टून मालिका खूप आवडते. या मालिकांमुळे मनोरंजनाबरोबरच ज्ञानात भर पडते. पारंपरिक मालिकांपेक्षा इतर वेगळेपण राखून कार्टून मुलांना भावते. विशेष करून मालिकांमधील छोटा भीम हा सर्वांचा आवडता हीरो आहे.
प्रथमेश थोरात, उंटमोहल्ला गल्ली, भुसावळ
धमाल मस्ती आवडते - शाळा राहिली की घरात आई- वडील नेहमी सांगतात की, अभ्यास कर. मात्र, आता उन्हाळी सुटी असल्याने मनमुरादपणे खेळणे आणि टीव्हीवरील कार्टून पाहणे सुरू आहे. कार्टूनमधील छोटा भीम लाडू खाऊन ढिशुमढिशुम करतो. त्यामुळे मजा वाटते. जितेश पाटील, उंटमोहल्ला गल्ली, भुसावळ
मुले करतात अनुकरण - मुले मालिकांतील पात्रांचे अनुकरण करतात. त्यांच्या सारखेच कपडे, खेळणी त्यांना हवी असतात. मात्र, मालिकेतून पात्रांचे अनुकरण करताना मुले चक्क एकमेकांना मारहाण करत आहेत. दिवसभर टीव्हीवर ढिशुमढिशुम करणारा ‘छोटा भीम’ त्यांना आवडू लागला आहे.
उन्हापासून बचाव - तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. मुलांनी घराबाहेर खेळू नये, उन्हात फिरू नये म्हणून केबल घेतली. डीश टीव्हीवर लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या कार्टून मालिका असतात. मुले घरात बसून दिवसभर त्या मालिका पाहतात. उन्हापासून मुलांचा बचाव होतो आणि त्यांचे मनोरंजनही होते.
धर्मेंद्र थोरात, पालक, भुसावळ
कार्टून बघण्याची मजा - शाळांना सुटी लागली आहे. दिवसातून आता पाच ते सहा तास टीव्हीवरील कार्टून पाहते. सायंकाळी पाच वाजता थोरात सरांकडे शुद्धलेखन कलेचा क्लास लावला आहे. असा नित्यनियम ठरलेला असतो. कार्टून पाहून माझा छंद जोपासते.
वैशाली दर्डा, सिंधी कॉलनी, भुसावळ
छोटा भीमचा पराक्रम - सुटी असल्याने अभ्यासाचे टेंशन नाही. उन्हात खेळू नको, असे घरातील मंडळी सल्ला देतात. त्यामुळे घरात बसून कार्टून पाहतो. कार्टून पाहण्याची आवड निर्माण झाली आहे. छोटा भीमचा पराक्रम खूप आवडतो. भुवनेश पाटील, विठ्ठलमंदिर वार्ड, भुसावळ