आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deputy Chiff Minister Ajit Pawar Comment Goppinath Munde

घर का फुटलं? याचे गोपीनाथ मुंडेंनी आत्मपरिक्षण करावे- अजित पवार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर: भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांचं घरं का फुटलं? याचे मुंडेंनी स्वत: परिक्षण करावे, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अज‍ित पवार यांनी मंगळवारी केली. गोपीनाथ मुंडे स्वत: पक्ष बदलण्याचा विचार करतात तो योग्य असतो, आणि इतरांनी केला तर तो अयोग्य असतो का? असा सवाल देखील पवार यांनी केला.
गोपीनाथ मुंडे हे स्वत: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या वाटेवर होते, असे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आमदार धनंजय मुंडे यांनी परळी नगराध्यपदासाठी गटबाजी केल्यानंतर मुंडे घराण्यातील वाद समोर आले होते. धनंजय मुंडे यांच्या मागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप होत असताना मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या बंडखोरीमागे राष्ट्रवादीची फूस असल्याचा आरोप मुंबईत केला. या आरोपांना अजित पवार यांनी सिन्नरमध्ये प्रत्युत्तर दिले. गोपीनाथ मुंडे यांनी आपलं घर कशामुळे फुटलं, आधी याचा विचार करावा. उगाच काहीही बडबडू नये, असेही पवार म्हणाले.
पंडित अण्णा मुंडे यांचा गुरुवारी राष्ट्रवादी प्रवेश
आचारसंहिता भंगप्रकरणी अजित पवारांची लेखी दिलगिरी
पक्षासोबत असेल तोच माझा नातेवाईक - गोपीनाथ मुंडे