आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई दर घटला तरी बाजारात भाववाढीचे चटकेच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सरकारी आकडेवारीनुसार जानेवारी 2012 मध्ये अन्नधान्य महागाई दर 6.55 टक्क्यापर्यंत खाली आला आहे. गत 26 महिन्यातील हा निच्चांक असला तरी वस्तुस्थिती ही वेगळीच आहे. हंगामी वस्तू सोडल्या तर ग्राहकांना जानेवारी 2011 ते जानेवारी 2012 या एका वर्षात प्रती किलो खाद्यतेलासाठी 18 रुपये, पेट्रोलसाठी प्रतीलिटर 20 रुपये, दुधासाठी तीन ते पाच रुपये (प्रतिलिटरमागे) जास्त मोजावे लागत असून साखर, डाळ, तांदूळ यांचेही भाव चढेच आहेत.
किमतीत सतत वाढ - अर्थशास्त्रज्ञांच्या मते महागाई दर घटला म्हणजे वस्तूंचे भाव घटतातच असे नाही उलट वस्तूंच्या किमती कायम वाढतच राहतात. जानेवारी 2012 मध्ये, एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपये आहे. याच वर्षात महागाईचा दर सात टक्के राहिला तर या वर्षाच्या शेवटी वस्तूची किंमत 107 रुपये राहील. जर 2013 मध्ये, महागाईचा दर 7 वरून घटून 5 टक्क्यांवर आला तर वस्तूची किंमत वर्षाच्या शेवटी वाढून 112 रुपयांवर पोहोचेल. जोपर्यंत महागाई दर शून्य टक्क्यांच्या खाली जात नाही तोपर्यंत, वस्तूंच्या किंमती कमी होत नाही. जानेवारी 2012 मध्ये अन्नधान्याचा मुद्रास्फिती दर शून्यावरून 0.52 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
महागाईला तांत्रिक कारणेच जबाबदार - ज्यावर महागाई निर्धारित केली जाते त्या प्राइझ इंडेक्समध्ये केवळ पाच टक्के हिस्सा अनधान्याला, तीन टक्के हिस्सा फळे आणि पालेभाज्यांचा आहे. सर्वाधिक उत्पादित वस्तूंचा या इंडेक्समध्ये समावेश असून, या वस्तूंच्या किंमती कमी झाल्या की, प्राइझ इंडेक्स खाली येतो, महागाई दर घटतो मात्र, हा घटलेला दर अन्नधान्य वस्तूंचे भाव घटण्यात परावर्तीत होत नाही. त्यामुळे महागाईचा दर घटूनही महागाई वाढतेच. - डॉ. विनायक गोविलकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ