आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैला खानचे उंटदरीतील फार्महाऊस आईच्या नावावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी - गूढरीत्या बेपत्ता होऊन नंतर हत्या झालेली पाकिस्तानी अभिनेत्री लैला खानचे इगतपुरीच्या उंटदरीतील फार्महाऊस हे दुसरे-तिसरे कुणाचे नसून तिच्या आईच्याच नावावर असल्याचे उघड झाले आहे. इगतपुरी महसूल विभाग आणि नगरपालिका हद्दीत त्याचे पुरावेही मिळाले आहेत.
तळेगाव (ता. इगतपुरी) जवळ 271/1/271/2/271/3/272/1/272/2 या गटातील (भूमापन) प्लॉट क्रमांक 34 हा मानस हिल्स अँड शोअर्स रिसॉर्ट लिमिटेडकडून 2003 मध्ये लैला खानची आई शेलिना नादीर पटेल तसेच रेश्मा शेलिना पटेल यांच्या नावावर खरेदी झाल्याची नोंद महसूल विभागाकडून मिळाली आहे. हा प्लॉट 146 चौरस मीटरचा असून, 25 डिसेंबर 2003 ला दस्तऐवजात खरेदीची नोंद झाली आहे.
मूळ पाकिस्तानी वंशाची असलेली लैला बॉलीवूडमध्ये पदार्पण करू इच्छित होती. दीड वर्षापूर्वी लैला बेपत्ता झाल्याची तक्रार मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी इगतपुरीच्या उंटदरी परिसरातील या फार्महाऊसमध्येही लैलाचे वास्तव्य असल्याच्या माहितीने खळबळ उडाली होती. त्यानंतर लैलाच्या आईसह चौघांची गोळी घालून हत्या केल्याची कबुली या घटनेतील मुख्य आरोपी परवेझने दिली होती. त्यानंतर लैलाचे वडील नादीर पटेल यांनी आपल्या कुटुंबातील एकूण सहा व्यक्तींचे दोन जणांनी अपहरण केल्याचे तक्रारीत नमूद केले होते.