आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैला खान हत्याकांड : इगतपुरीतील दोन ड्रायव्हर ताब्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी- पाक अभिनेत्री लैला खान व तिच्या कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी सोमवारी मुंबई एटीएसच्या पथकाने लैला खानच्या वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करणाºया येथील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन मुंबईला नेले. लैलासह तिच्या कुटुंबीयांचे मृतदेह अजून सापडले नसल्याने येथील तिच्या फार्महाऊसच्या परिसरातही रात्री उशिरापर्यंत मुंबई गुन्हे शोध पथक तसेच एटीएसकडून चौकशी सुरू होती.
लैलाच्या स्कॉर्पिओ वाहनावर जॉनी गिल्डर (रा. बारा बंगला रोड, इगतपुरी) व मेहबूब शेख (रा. दादासाहेब गायकवाडनगर, इगतपुरी) हे रोजंदारीवर बदली ड्रायव्हर म्हणून काम करत होते. इगतपुरी ते जम्मूतील हॉटेल आशियापर्यंत लैलासह तिच्या कुटुंबीयांची तसेच फार्महाऊसमध्ये पाळलेल्या काश्मिरी मांजर व तिच्या तीन पिल्लांची ने-आण स्कॉर्पिओतून व्हायची, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. तळेगाव शिवारात असलेल्या लंगड्याची वाडी परिसरातील फार्महाऊसमध्ये लैलासह तिच्या कुटुंबीयांची हत्या झाल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच फार्महाऊसच्या परिसरातच मृतदेह पुरल्याचाही संशय आहे. त्यामुळे एटीएस त्या दिशेने तपास करत आहे.
परवेजला 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडी- दरम्यान, या प्रकरणात जम्मूहून अटक करण्यात आलेला आरोपी परवेज टाक याला 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने दिले. आपण लैलाची लोखंडी सळईने हत्या केल्याचे परवेजने कबूल केले आहे. परवेज वेळोवेळी आपला जबाब बदलत आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याचे सांगत पोलिसांनी त्याला कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
लैला खानचे उंटदरीतील फार्महाऊस आईच्या नावावर
बॉलिवूड अभिनेत्री लैला खानच्या ठावठिकाण्याचे गूढ कायम? अज्ञातस्थळी की खून?
EXCLUSIVE : दाऊदच्या इशा-यांवर नाचत आहे बॉलिवूड अभ‍िनेत्री लैला