आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबरी पतनची दुवापठण परंपरा खंडित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- बाबरी मशीदच्या विध्वंसानंतर पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ रस्त्यावर येऊन बाबरी पतनाच्या निषेधार्थ दुवापठण करण्याची शहरातील परंपरा या वर्षी नेतृत्वाअभावी खंडित झाली.
1992 ला बाबरी मशीद कोसळल्यानंतर दरवर्षी 6 डिसेंबरला मालेगावात मोठा तणाव तसेच दुपारी अजान, नमाज अथवा दुवापठण करून प्रतिक्रिया दिली जात होती. दरम्यानच्या काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येणा-या 6 डिसेंबरला असेच अवास्तव महत्त्व देत रस्त्यावर नमाजपठणाचे कार्यक्रम झाल्याचा मालेगावचा इतिहास आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही तीव्रता ओसरली. किदवाईरोडवर धाडसाने जमणारा जमाव कालांतराने कमी होत गेला. तीन वर्षांपूर्वी केवळ 50-60 तरुणांच्या जमावाने दुवापठण केले होते. पोलिसांनी त्यांना रोखलेही नाही. त्यामुळे 6 डिसेंबरची तणावाची भीतीही कालांतराने मागे पडली.
दरवर्षीप्रमाणे मंगळवारीही दुपारी दुवापठणाचे आवाहन काही संघटनांनी केले होते. किदवाईरोडवर काही तरुण जमले होते. मात्र प्रतीक्षा करूनही दुवापठणाचे नेतृत्व करत चौकात जाण्याचे धाडस कुणी केले नाही.