आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Minister Sharad Pawar Comment On Mamata And Pranav Mukharjee

ममता पाठिंबा देतील अन् प्रणवदांच राष्ट्रपती होतील; शरद पवारांना विश्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे: केंद्रातील सत्तारुढ संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) राष्‍ट्रपतीपदासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जींना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी या प्रणवदांनाच पाठिंबा देतील, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केला. राष्‍ट्रपतीपदी प्रणव मुखर्जी हे निश्चितच विजयी होतील, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
राष्ट्रपतीपदासाठी सर्व पक्षिय चर्चा करूनच मुखर्जींचे नाव यूपीए अध्यक्षा सोनिया पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नाव निश्चित केले आहे. याशिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यासोबतही त्याबाबत चर्चा झाल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.
मुखर्जींची उमेदवारी ही पश्चिम बंगालसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे ममता बॅनर्जीही मुखर्जींसाठी एक पाऊल मागे घेतील, असे पवार म्हटले.
राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दाखल केलेले पी.ए.संगमा यांच्याशी पक्ष बैठकीत चर्चा करणार असून संगमा उमेदवारी मागे घेतील, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे. संख्याबळ पाहता प्रणव मुखर्जींना विजयी होण्यास फारशी अडचण येणार नाही.
प्रणवदांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच अनेक पक्षांचा पाठिंबा
काँग्रेस प्रणवदांवर ठाम राहिली तर मतदान अटळ : ममता
राष्‍ट्रपतीपदावरून राजकीय वातावरण गरम, ममता दिल्‍लीत