आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरोधकांनी केले राजकारण व्यक्तिकेंद्रित : केतकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘केवळ काँग्रेसला विरोध आणि नेहरू-गांधी घराण्याचा द्वेष या दोन मुद्दय़ांवरच विरोधक आक्रमक होतात. त्यामुळे देशाचे सगळे राजकारण व्यक्तिकेंद्रित झाले आहे,’ असे मत दै. ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.

‘एफडीआयला 2000 मध्ये पाठिंबा द्यायचा आणि आता विरोध करायचा. सरबजितसिंगच्या मुद्दय़ावरून पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची मागणी करणार्‍या याच विरोधकांनी संसदेवर हल्ला झाल्यानंतर सहा महिन्यांतच समझोता एक्सप्रेस काढली. विरोधी पक्षांनी देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल कधीच स्वत:ची स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही,’ अशी टीका केतकर यांनी केली.

ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांच्या ‘साधना’तील लेखांचे संकलन असलेल्या ‘सेंटर पेज’ पुस्तकाचे प्रकाशन केतकर यांच्या हस्ते पुण्यात झाले. या वेळी द्वादशीवार यांनी भ्रष्टाचार, हिंसाचार, मुस्कटदाबीच्या विरोधात बोलले पाहिजे असे म्हटले.

पवारांची तत्त्वशून्यता
‘राजीव गांधी यांच्यानंतर कॉँग्रेसची सूत्रे हाती घ्या, अशी विनंती सोनिया गांधी यांना करण्यासाठी 1991 मध्ये शरद पवार गेले होते. 1998 मध्ये सोनिया गांधींनी राजकारण प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर याच पवारांनी संसदेच्या पायर्‍यांवरून त्यांचे स्वागत केले. 1999 मध्ये मात्र सोनिया गांधींचा जन्मच भारतात झाला नसल्याचा ‘साक्षात्कार’ झाला. अचानक त्यांचा मराठी बाणा जागा झाला व त्यांनी ‘राष्ट्रवादी’ पक्ष काढला. पवारांच्या या भूमिका बदलण्यामागे कोणते तत्त्व होते,’ असा प्रश्न केतकर यांनी उपस्थित केला.