आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian President Pratibha Patil Problem For Pune House.

पुण्यातील बंगल्याच्या जागेवरुन राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील अडचणीत?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे: राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या त्यांच्या पुण्यामध्ये तयार होत असलेल्या निवासस्थानामुळे वादात अडकण्याची शक्यता आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती पाटील यांना पुण्यात २,६१,०० चौरस फुटांचा भूखंड देण्यात आला आहे. लष्कराच्या ताब्यातील या भूखंडावर त्यांच्या बंगल्याचे कामही सुरु झाले आहे. नियमानुसार राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर केवळ ४५०० चौरस फुटांचा सरकरी बंगला किंवा २ हजार चौरस फुटांचा सरकारने भाड्याने घेतलेला बंगला दिला जाऊ शकतो.
दरम्यान, राष्ट्रपती भवनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. राष्ट्रपती कार्यालयाच्या अधिका-यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपतींचा कार्यकाळ अजून संपलेला नाही. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाबत अद्याप कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच अधिका-यांनी हेही स्पष्ट केले की, पुण्यातील जमीन राष्ट्रपतींच्या ताब्यात नसून त्या जागेवर अजून लष्कराचेच नियंत्रण आहे.
पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाच्या भागात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निवासस्थानासाठी लष्कराचा भूखंड देण्यात आला आहे. लष्कराचा भूखंड देण्याला माजी सैनिकांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते, लष्करातील सैनिकांना देण्यासाठी लष्कराकडे मुबलक जागा उपलब्ध नाही. असे असतांना राष्ट्रपतींना ही वादग्रस्त जागा देण्यात येऊ नये. मात्र, विरोध करणा-या माजी सैनिकांचे म्हणणे आहे की, या वादग्रस्त जागेवर राष्ट्रपती पाटील यांनी बांधकामही सुरु केले आहे. याआधी परदेश दौ-यावर २०० कोटी रुपये खर्च केल्याच्या मुद्यावरुन राष्ट्रपतींवर टीका झाली होती.
ज्ञानसंपन्नतेमुळेच राष्ट्राची प्रगती-राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
यशवंतरावांनी महिलांना सन्मान दिला- राष्ट्रपती
देशाचा विकासदर यंदा ८ ते ९ टक्के राहील - राष्ट्रपती