आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती निवडणूक - प्रणवदांना ममता पाठिंबा देतील - शरद पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - देशाच्या राष्ट्रपतिपदासाठी सर्वत्र जोरदार मोर्चेबांधणी सध्या सुरू असून या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वातंत्र्यानंतर प्रथमच राष्ट्र पतिपदी विराजमान होणा-या बंगाली व्यक्ती प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देतील, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उत्साही असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पी.ए. संगमा हे निवडणुकीतून माघार घेतील असेही त्यांनी सांगितले.
पवार म्हणाले, संयुक्त लोकशाही आघाडीतील घटक पक्षांची राष्ट्र पतिपदासाठीची मतांची बेरीज पाहता मुखर्जी यांना विजयापेक्षा अधिकची मते उपलब्ध आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाने वेगळी भूमिका घेतली तरीसुद्धा मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव व मायावती यांचे पक्ष युपीऐसोबत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी पाठिंबा मिळवण्याबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संपर्क साधला आहे. अर्थिक धोरणाबाबत डाव्या पक्षांशी मतभेद असले तरी त्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रपतिपदाच्या या सर्वोच्च पदावरील निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता विचारविनिमयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
नारायणमूर्तीं, प्रेमजींचा आदर - उद्योजक नारायण मूर्र्ती व अझीम प्रेमजी यांनी विकासात शासन दिसत नसल्याचे वक्तव्य नुकतेच केले होते याबाबत पवार म्हणाले, या दोन्ही उद्योजकांनी शून्यातून आपले भरीव कार्य निर्माण केले असून जगात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांची टीका योग्य असली तरी गतिमानरीत्या देशाचा विकास होण्यासाठी एखाद्या पक्षास बहुमत असण्याची गरज आहे.
मुख्यमंत्र्यांना कोपरखळी - राज्यातील उद्योगधंद्याची गुंतवणूक राज्याबाहेर चालले या वक्तव्यावर पवार म्हणाले, मी नियोजन आयोगाचा सदस्य असून देशातील सर्व राज्यांचे आर्थिक चित्र माझ्यासमोर येत असते. राज्यात कधीकाळी मी गुंतलेलो होतो त्यामुळे राज्यात किती गुंतवणूक येते याची मलाही कल्पना आहे. चाकण येथील काही उद्योजक मला भेटून त्यांनी औद्योगिक धोरणाचे प्रश्न मांडल्याचे मी अस्वस्थ झालो होतो. सुसंगत धोरणाची अंमलबजावणी होत असेल तर स्वागतच आहे.
मान्सून लांबण्याची चिन्हे - मान्सून लांबल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे का? यावर पवार म्हणाले, मी देशातील व परदेशातील हवामान खात्यांच्या संपर्कात असतो. यंदा मान्सून लांबणार याबद्दल आपणास माहिती होती पण काळजी करण्यासारखे कारण नसून 22 जून नंतर परिस्थितीत फरक पडेल. बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, सातारा व सांगली या कायमस्वरुपी दुष्काळी भागासाठी दीघर्कालीन उपाययोजना सुचवण्यासाठी नेमलेली समिती 3 महिन्यात आपला अहवाल सादर करेल.
प्रणवदांच्या खास ११ गोष्टी: चिदंबरम यांच्याशी ३६ चा आकडा
प्रणव v/s कलाम: उमेदवार सहमतीने ठरणार की सौदेबाजीने ?
जनतेची पसंती अब्‍दुल कलामांना तर सट्टेबाजांची प्रणव मुखर्जींना
शरद पवार यांची चौकशी 25 वर्षांतही होणार नाही - अण्णा हजारे