आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालय आगीची जबाबदारी सामूहिक - उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मंत्रालयाला लागलेल्या आगीची जबाबदारी आम्हा सत्ताधा-यांना सामूहिकरीत्या घ्यावी लागेल. याचे खापर कोणा एकावर फोडता येणार नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.
या प्रकरणी कोणावर गुन्हा दाखल होणार, या प्रश्नाला मात्र थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. पवार म्हणाले, की मंत्रालयाची स्थिती पूर्ववत करण्यास आमचे प्राधान्य आहे. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर अनेक गोष्टी पुढे येतील. आग लागल्यानंतर मंत्री त्वरेने बाहेर पडले. त्यांनी इतरांची काळजी केली नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पवार त्वेषाने एकेरीवर येऊन म्हणाले, ‘‘त्या बाबाला दिल्लीत बसून काही माहिती नाही. प्रत्यक्ष मंत्रालयात येऊन त्यांनी पाहायला हवे होते. दुर्घटनेचेही राजकारण करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे.’’
विधानाचा विपर्यास - मुख्यमंत्र्यांचे दालन सुरक्षित राहिल्याप्रकरणी मी कोणताही संशय व्यक्त केला नव्हता, असे पवार यांनी स्पष्ट केले. आग विझल्यानंतर मी त्यांच्या दालनाची पाहणी केली तेव्हा सर्व वस्तू सुरक्षित राहिल्याचे आढळले, एवढेच मी म्हणालो. त्याचा विपर्यास केला गेला. मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या दालनातील लॅपटॉप, फायली, कोट आदी वस्तूही सुरक्षित होत्या. या दोन्ही दालनांच्या भिंती विटाच्या असल्यामुळे त्या ठिकाणी आग भडकली नव्हती.
आगीला मी जबाबदार नाही : छगन भुजबळ