आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns, Bjp, Shivsena Activist Clash With Suresh Kalmadi Supporters

मला कोणीही रोखू शकत नाहीः कलमाडी, महापालिकेत प्रवेशावरुन राडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणेः राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपी खासदार सुरेश कलमाडी आज पुणे महापालिकेत दाखल झाले. परंतु, त्‍यांच्‍या आगमनामुळे महापालिकेसमोर विरोधी पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांनी कडाडून विरोध केला. त्‍यामुळे कलमाडी समर्थकही त्‍यांच्‍यावर चालून गेले. अखेर कलमाडी मागच्‍या दाराने पालिकेत दाखल झाले.
राष्‍ट्रकुल घोटाळ्यात जामीन मिळाल्‍यानंतर कलमाडी प्रथमच महापालिकेत दाखल झाले. त्‍यांना भाजप, शिवसेना आणि मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांनी जोरदार विरोध केला. विरोधकांचे कार्यकर्ते कलमाडींच्‍या विरोधातील फलक घेऊन महापालिकेसमोर गोळा झाले. त्‍यांनी कलमाडींना महापालिकेत प्रवेश करण्‍यापासून रोखले. त्‍यावेळी कलमाडी समर्थक विरोधकांशी भिडले. त्‍यामुळे काही काळ पालिकेसमोर तणावाची स्‍थती निर्माण झाली होती.
एकीकडे शिवसेना, भाजप आणि मनसेच्या कार्य़कर्त्यांनी घोषणाबाजी आणि पोस्टर दाखवत जोरदार विरोध केला. तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवत कलमाडींचे स्वागत केले. कलमाडी यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चाही केली.

'मला कोणीही रोखू शकत नाही'
मी आजही पुण्‍याचा खासदार आहे. पुण्‍याच्‍या विकासासाठी मी काम करतच राहणार असून त्‍यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही, अशी प्रतिक्रीया कलमाडी यांनी दिली.