आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कर जमीन घोटाळा : सीबीआय वकिलावर ताशेरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लोहगाव येथील लष्कराच्या 69 एकर जमीन घोटाळ्यात न्यायालयाने आरोपी बनलेले सीबीआयचे वकील विवेक सक्सेना यांनी सोमवारी न्यायालयात आपण आरोपी नाही, असा दावा केला. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक महेंद्र शहा यांना न्यायालयाने बजावलेली नोटीस न पाठवल्याने विशेष सत्र न्यायाधीश डी.आर.महाजन यांनी सक्सेना यांना चांगलेच फटकारले.
तपास अधिकारी एम.एन.परब, बांधकाम व्यावसायिक रमेश गोवानी, महेंद्र शहा व सक्सेना यांना 24 ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तपास अधिकारी परब व सक्सेना यांनी दोन बांधकाम व्यावसायिकांची नावे वगळल्याने न्यायालयाने आरोपी बनवले. न्यायमूर्ती महाजन यांनी तुम्ही स्वत: प्रकरणांत आरोपी असताना दुस-याची बाजू कशी मांडता, हा न्यायालयाचा अवमान आहे असे सक्सेना यांना फटकारले.