आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Statement On Raj And Bala Saheb Thakarye By Katju

'बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे हे स्‍वतः परप्रांतीय'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - परप्रांतीयांनी महाराष्ट्रात यायचे नाही, अशी भूमिका जर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे घेत असतील तर त्यांनीच आधी या राज्यातून चालते व्हावे. कारण ठाकरेसुद्धा महाराष्ट्राचे भूमिपुत्र नाहीत, अशा शब्दांत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांनी शुक्रवारी ठाकरे काका- पुतण्यांवर टीका केली.
व्होटबँक डोळ्यासमोर ठेवून ‘भूमिपुत्र’ या संकल्पनेच्या नावावर राजकारण करणारे देशद्रोही आहेत. स्थानिक आणि बाहेरचे असा भेद निर्माण करणारे आणि त्याचा प्रसार करणारे देशाचे शत्रू आहेत, अशी टीकाही काटजू यांनी केली. पुण्यातील शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसमोर दिलेल्या व्याख्यानात त्यांनी हे विचार मांडले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना काटजू यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.महाराष्ट्रात इतर राज्यातून लोक जगण्यासाठी आले तर त्यांना विरोध होता कामा नये. हे कृत्य घटनेने दिलेल्या हक्कांच्या विरोधातीलच आहे. कामधंद्यासाठी आलेल्या गरीब नागरिकांना मारहाण करण्यात कसले आले शौर्य? हे फक्त मतांसाठी केले जाणारे राजकारण आहे, असा टोला त्यांनी लगावला.
हल्लाविरोधी कायदा तातडीने आणा - पत्रकार हल्लाविरोधी कायदा तातडीने अमलात आणण्याचा आदेश राज्य सरकारला देणार आहे. यासंदर्भात शासनाने नेमलेल्या राणे समितीच्या अहवालाची माहिती घेणार असल्याचे न्या. काटजू यांनी सांगितले. पत्रकारांना निर्भय वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पत्रकारांना मारहाण झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असेही काटजू यांनी पुणे र्शमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाशी बोलताना स्पष्ट केले.
परप्रांतीय अधिकार्‍यांना लागली मराठीची गोडी.!

औरंगाबाद शहरात एक लाखापेक्षा जास्त परप्रांतीय!
बिहार शताब्दी महोत्सवाला महाराष्ट्र गीताने प्रारंभ