आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश कलमाडी, अशोक चव्हाण निर्दोषच : दिग्विजय

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळा प्रकरणी खासदार सुरेश कलमाडी निर्दोषच आहेत. त्यांची चौकशी पूर्ण होऊन चार्जशीटही दाखल झाल्याने न्यायालयाने त्यांना जामीन द्यावा, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी सोमवारी व्यक्त केली. तसेच आदर्श प्रकरणात अशोक चव्हाणही निर्दोष असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
दिग्विजय सिंग म्हणाले, की कलमाडी यांच्याप्रमाणेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेही आदर्श घोटाळ्यात निर्दोष असून त्यांना पायउतार व्हावे लागले याचे दु:ख वाटते. माहितीच्या अधिकारामुळेच सध्या अनेक घोटाळे पुढे येत आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्व धर्मियांचा समावेश असून त्या सर्वांना सन्मान मिळावा, अशी आपली अपेक्षा आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती होवो अथवा न होवो स्वतंत्र लढण्याचीही तयारी चालू ठेवा आणि सांप्रदायिकतेस वाव मिळणार नाही याची दक्षता घ्या, अशी सूचनाही त्यांनी केली. जी युती सांप्रदायिकता जपत हिंसेचे राजकारण करते, त्यांनाच आठवले जाऊन भेटतात याची मी निंदा करतो, अशा शब्दात त्यांनी आठवलेंवर टीका केली.