आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Kalmadi Will Contest Loksabha Election From Pune

पुण्यातूनच २०१४ची लोकसभेची निवडणूक लढविणार- कलमाडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सन २०१४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक आपण पुण्यातूनच लढविणार असल्याचे राष्ट्रकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले.
पुण्यामध्ये एका बैठकीनंतर वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना २०१४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक पुण्यातूनच लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. कलमाडी यांना २०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना तिहार तुरंगात नऊ महिन्यापेक्षा जास्त काळ काढावा लागला होता. मात्र, मागील महिन्यात कलमाडींना न्यायालयाने जामीन मंजूर केला. काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केले असल्याने त्यांचा पक्षात अधिकृत वावर नसला, तरी त्यांनी पडद्यामागून सुत्रे हलविली होती. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २८ जागा जिंकल्या, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.