आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभूमीवर सध्या सरावापेक्षा प्रयोगांना महत्त्व, ज्येष्ठ मणिपुरी रंगकर्मी कन्हाईलाल यांची खंत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- रंगभूमीवर नाट्य सादर करणे ही एक कला असून ती नैसर्गिकरीत्या सादर करण्यासाठी कठोर मेहनत घेऊन सराव करावा लागतो. पण सध्याच्या काळात प्रसिद्धीसाठी सरावावर भर न देता अधिकाधिक प्रयोगांवर भर दिला जातो, अशी खंत ज्येष्ठ मणिपुरी रंगकर्मी हयसनम कन्हाईलाल यांनी व्यक्त केली.
रूपवेध प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा एक लाख रुपयांचा या वर्षीचा ‘तनवीर सन्मान’ त्यांना कलाइतिहासतज्ज्ञ डॉ.सरयू दोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. या वेळी नाट्यलेखक व दिग्दर्शक गिरीश जोशी यांना ‘तनवीर नाट्यधर्मी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, दीपा लागू, महेश एलकुंचवार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी उपस्थित होते.
कन्हाईलाल म्हणाले, मणिपूरमधील युवकांचा कल झटपट पैसा मिळवण्याकडे वाढत असल्याने नाट्यक्षेत्रात ते येण्यास इच्छुक नाही. रंगभूमीवर काम करताना शिस्त, साधना, कामावरची श्रद्धा व सराव याची गरज आहे. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, हा पुरस्कार अभिनय क्षेत्रात काम करणा-या कुटुंबाकडून प्राप्त झाला असून पद्मश्री पुरस्कारापेक्षा अधिक आनंद हा पुरस्कार मिळताना झाला आहे.
जोशी म्हणाले, मला वेगवेगळया प्रयोगांची नाटके आवडतात. त्यात मला असे जाणवले की, आपल्याकडे तंत्रज्ञानाच्या वापरास नाटकात आशयापेक्षा कमी महत्त्व दिले जाते.