आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Is A Misinformation Campaign Against Me By The Sports Ministry Says Suresh Kalmadi

मी लंडनला जाणारच - कलमाडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी खासदार सुरेश कलमाडी यांनी ऑलिम्पिकला उपस्थित राहण्यासाठी लंडनला जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत कलमाडी यांनी कोर्टाने मला गुन्हागार ठरवलेले नसल्याचे सांगत, मी एशियन अॅथिलेटिक संघटनेचा अध्यक्ष आहे. या नात्याने मी ऑलिम्पिक स्पर्धेला हजेरी लावण्यासाठी लंडनला जाणार आहे.
कॉमनवेल्थ घोटाळ्यात जामीनावर सुटलेल्या कलमाडी यांनी पटियाला कोर्टाकडे लंडनला जाण्याची परवानगी मागितली होती. त्यांना १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर लंडनवारीची परवानगी देण्यात आली आहे.
कलमाडी यांनी यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन हे क्रीडासंघटना विरोधी असल्याचा आरोप केला. पंतप्रधानांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.
मला कोणीही रोखू शकत नाहीः कलमाडी, महापालिकेत प्रवेशावरुन राडा
पुण्यातूनच २०१४ची लोकसभेची निवडणूक लढविणार- कलमाडी
स्वागताने भारावले कलमाडी;पत्राद्वारे पुणेकरांचे आभार !