आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्‍यात ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांना मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कबीर कला मंच या कथित वादग्रस्त संघटनेचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (एनएफएआय) आयोजित कार्यक्रमात आनंद पटवर्धन यांची ‘जयभीम कॉम्रेड’ ही फिल्म, त्यावरील चर्चा आणि नंतर कबीर कला मंचचे सादरीकरण, असे कार्यक्रम झाले. ते संपल्यावर संग्रहालयाच्या आवारात अभाविपचे काही कार्यकर्ते आले. कार्यक्रमाच्या आयोजनावरून त्यांच्यात वाद आणि मारामारीत झाली. त्यात पाच विद्यार्थी जखमी झाले. याउलट अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मंचाच्या लोकांनीच आम्हाला मारल्याची व काही कार्यकर्ते जखमी झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी प्रभात रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.