आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा, ताकाला जाऊन भांडे लपवू नका : मुख्यमंत्री

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अण्णा हजारे यांनी जनलोकपालच्या संदर्भात मुंबईत केलेल्या आंदोलनाचे चित्र सर्वांसमोर आले आहे. अण्णांनी कॉग्रेसच्या विरोधात बोलावे अथवा बाजूने बोलावे, पण ताकास जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार करू नये, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. आगामी निवडणुकीत कॉँग्रेसविरोधात प्रचार करणार, हे अण्णांचे वक्तव्य राजकीय हेतूनेच आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ते म्हणाले की, पुण्याच्या रखडलेल्या विकास आराखड्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, डीपीचा मुद्दा आता फक्त जैवविविधता प्रश्नावर अडकला आहे. या आराखड्यातील 573 हेक्टर क्षेत्र खासगी आहे. त्यासाठी सुमारे बारा कोटींची गरज आहे. मात्र महापालिका ती आता देऊ शकत नाही. त्यामुळे टीडीआर देणे किंवा चार टक्के बांधकामाला परवानगी देणे एवढेच पर्याय शिल्लक आहेत. यापुढे कोणताच विकास आराखडा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रखडणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. सदनिकाधारकांच्या संदर्भातील प्रश्न गुंतागुंतीचे बनत आहेत. त्यांना ग्राहकमंचकडे धाव घ्यावी लागत आहे. ती प्रक्रिया वेळखाऊ आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नवीन कायदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे फ्लॅटधारकांच्या समस्या कमी वेळात मार्गी लागण्यास मदत होऊ शकेल, असे ते म्हणाले.