आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्‍ल्‍यू फिल्‍म दाखवून नागपुरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर: नागपुरातील हुडकेश्वर भागात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दोन शाळकरी मुलींवर पाच तरुणांनी सामुहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी पाचही नराधमांना अटक केली आहे. प्रशांत जोगदंड, संजय सोनटक्के, पंकज दूधबावडे, छगन श्रीवास आणि भूषण जावरे अशी आरोपींनाची नावे आहेत. हे एकाच वस्‍तीतील राहणारे आहेत.
पीडित मुली आरोपी पंकज दुधगावले याच्या परिचयातील आहे. त्याने एका मुलीला फोन करून बोलावले होते. ही मुलगी पंकजला भेटायला तिच्या बाजूला राहणार्‍या एका 12 वर्षीय मुलीला घेऊन गेली. पंकज या दोघींना त्याचा मित्र छगन श्रीनिवासच्या घरी घेऊन गेला. छगनच्या घरी या वेळी कोणीही नव्हते. त्यानंतर या दोघांनी त्यांच्या तीन मित्रांना घरी बोलावले. बलात्कार करण्यापूर्वी या मुलींना आधी 'ब्लू फिल्म' दाखवण्यात आली. त्यांनी या पाचही नराधमांनी दोघींवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. दिवसभर त्यांच्यावर अत्याचार करून या भामट्यांनी त्यांना सोडून दिले.
घरी परतल्यानंतर त्यांनी आई-बाबांना आपल्यावर घडलेली आप बीती सांगितली. पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी श्रीनिवासच्या घरावर पाळत ठेऊन एकेकाला ताब्यात घेतले.
अल्पवयीन मुलीवर सलग 20 दिवस सामुहीक बलात्कार
ऑपरेशन थिएटरमध्येच महिलेवर सामुहिक बलात्कार
मित्राच्या मदतीने पित्यानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार